बैसवूनि आले गोधने आख
232.
बैसवूनि आले गोधने आखरी
खेळ नानापरी मांडियेला ॥१॥
वाजविती पावे मोह्या घमुती ।
छंदे त्या नाचती गाती ब्रीदे ॥२॥
आलके सेलके हमामा हुंबरी ।
झोंब्या घेती कुसरी निवडुनी गडी ॥३॥
लगोरियाचे चेंडु सुरकाडी मुरदांग ।
नानापरि आंग मोडुनिया ॥४॥
निळा म्हणे हरी पाहोनी निराळा ।
अवघियांच्या खेळा साक्षपणे ॥५॥
