ध्वज वज्रांकुश शोभती
513.
ध्वज वज्रांकुश शोभती चरणी । तो उभा रंगणीं वैष्णवांचे ॥१॥
झळकतसे हाती पद्म आणि गदा । पुंडलिक वरदा उभा विटे ॥२॥
चरणी भागीरथी गंगा ती शोभली । भक्तांची क्षाळिलीं महात्पापें ॥३॥
एका जनार्दनी सकळ तीर्थराव । उभा राह प्रभव विटेवरी ॥४॥
