चरणासी शरण तुझिया जे
161.
चरणासी शरण तुझिया जे येती । तेचि उतरती भवसिंधू ॥१॥
लक्षुमीने ज्याते असे आराधिले । ठेवी ती पाउले स्तनावरी ॥२॥
आवडीने शिवे मस्तकी वंदिले । ठेवी ती पाउले स्तनावरी ॥३॥
नामा ह्मणे ऐशी करिताती स्तुती । शिंपीयेली क्षिती अश्रुपाते ॥४॥
