वासनेचा त्याग करा रे
1926.
वासनेचा त्याग करा रे सर्वथा | भावे त्या अनंता शरण रिघा ॥१॥
कृपेचा सागर नुपेक्षी निर्वाणी | कळिकाळापासूनि सोडवील ॥२॥
भक्तजनपाळक अनाथ कैवारी | ब्रिदे चराचरी वर्णिताती ॥३॥
शरीर संपत्तीचा टाका अभिमान | मन करा तल्लीन विठ्ठल पायी ॥४॥
आसनी शयनी मनी चिंता रे गोविंदु | तेणे तुटे कंदु भवव्याधीचा ॥५॥
परदारा परनिंदा परधन परपीडन | सांडूनि भजन हरिचे करा ॥६॥
सर्वभूती कृपा संताची संगती | मग नाही पुनरावृत्ति मरण जन्म ॥७॥
शुकसनकादिक जनक चक्रवर्ती | परीक्षित प्रल्हाद बिभीषण ॥८॥
बळी भीष्म नारद उद्धव रुक्मांगद | शिबिये परमानंद पावविले ॥९॥
शास्त्रांचे हे सार वेदांचे गव्हार | नाम परिकर कलियुगी ॥१०॥
