वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

पाहा परदारा जननिये स

🙏 4. संत नामदेव · ABH-082282 · अभंग क्र. १९२५

1925.
पाहा परदारा जननिये समान | परद्रव्य पाषाण म्हणोनि मानी ॥१॥
निदेसी तू मुका होऊनि तत्त्वतः | परेद्वेषी तत्त्वतः न घाली दृष्टी ॥२॥
ऐसे दृढ मनी धरूनि राहसी | तरी माझे पावसी निजपद ॥३॥
पराकारणे प्राण वेंचि जो सर्वथा | जाणे परवेथा कळवळोनी ॥४॥
परसुखे संतोष धरी जो मानसी | जरी तुज परलोकासी जाणे आहे ॥५॥
देहाचा अभिमान न धरावा चित्ती | धरावी उपरति उपशम् ॥६॥
|सर्वकाळ प्रीति संतांचि संगति | गावे अनुरागे प्रीति ना माझी ॥७॥
सर्वांभूती सर्वदा ऐसी समबुद्धि | सांडावी उपाधि प्रपंचाची ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग