वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

जन्मोजन्मी केला लाग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087602 · अभंग क्र. ८६४

864.
जन्मोजन्मी केला लाग । म्हणोनि भाग पावलों ॥१॥
तेणे घडे संतसेवा । हेंचि देवा परम मान्य ॥२॥
आलिया जन्मांचे सार्थक । गांतां रामनाम देख ॥३॥
नामावांचुनी सुटिका । ब्रह्मादिका नोहे देखा ॥४॥
नाम जपे शूलपाणी । एका जनार्दनी ध्यानीं ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग