वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

कर्मी कर्मठपणा धर्मी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084375 · अभंग क्र. ५८६

586.
कर्मी कर्मठपणा धर्मीं धर्मिष्ठपणा । ही दोन्ही अनुसंधानें चुकती जगी ॥१॥
कर्माचें जे कर्म धर्माचा अधिधर्म । तो हा सर्वोत्तम विटेवरी ॥२॥
निगमांचे निजसार अगमाचे भांडार । न कळे ज्याचा पार वेदशास्त्रां ॥३॥
एका जनार्दनी श्रुतीसी नाकळे । तो भक्तिबळे उभा विटे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग