वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

कृपाळु भक्तांचा कैवा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089646 · अभंग क्र. ४९३

493.
कृपाळु भक्तांचा कैवारी ।
क्रोध दैत्यांदानवांवरी ।
एका तारी एका मारी ।
एका उध्दरी नाममात्रे ॥१॥
एका घरी एका दारी ।
एका ह्रदयी एका परिवरी ।
एका धुंडिता अष्टही प्रहरी ।
न सापडे माझारी त्रैलोक्या ॥२॥
एकपत्नीव्रत दशरथा घरी ।
रेणुकानंदन हा ब्रम्हचारी ।
मुंजिया बटु बळिच्या व्दारी ।
महा व्यभिचारी नंदाचा ॥३॥
मोहनी रुपे सुंदोपसुंद ।
मोहुनी परस्परे करविला वध ।
वृंदेसी करुनिया शकट भेद ।
वधिला जालंदर रणरंगी ॥४॥
मत्स्ये केला शंखोव्दार ।
कुमे घेतला धराभार ।
वराहे हिराण्यक्ष असुर ।
मर्दुनी धरा धरिली निजदंती ॥५॥
नृसिंह हिरण्यकश्प विदारिला ।
वामने बळी पाताळी घातला ।
परशुरामाने सहस्त्रार्जुन वधिला ।
पृथ्वीचा केला दान धर्म ॥६॥
रामे रावणाचे मर्दन ।
केले देवाचे बंदी मोचन ।
कृष्णे काळयवना जाळून ।
कंस चाणूर निवटिले ॥७॥
बौध्ये मोडविला दैत्ययज्ञ ।
वेदनिंदा निजमुखे करुन ।
कलंकिया म्लेंछचेनि निकंदन ।
पुढील कार्यार्थ हा असो ॥८॥
ऐसे अवतार घेउनी हरि ।
भूभार हरिले नानापरी ।
आपुलिया दासाचे रक्षण करी ।
संत चराचरी गर्जती ॥९॥
चतुराननरुपे सृष्टीचे सृजन ।
विष्णुरुपे प्रतिपाळण ।
रुद्ररुपे परम क्षोभोन ।
करील संहार सकळांचा ॥१०॥
शंभु त्रिपुराते संहारी ।
गजासुराचा मस्तक उतरी ।
गणेशरुपे नृत्यांच्या गजरी ।
एका दैत्या चुरी पदघाते ॥११॥
ऐसी हे चरित्रे श्रवण करिता ।
ठावो नुरेचि दोषा दुरिता ।
ब्रम्हानंदे श्रोता वक्ता ।
मुक्ति सायोज्यता पावती ॥१२॥
नानारुपे नाना नामे ।
नाना अवतार नाना कर्मे ।
धर्म रक्षिले ते सुखसंभ्रमे ।
निळा म्हणे सप्रेमे गर्जत ॥१३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग