प्रकरण :- ॥ समाजाचे
295.
प्रकरण :- ॥ समाजाचे वर्णन ॥
बहुत प्रकार बहुत या जगाचे । काय वानू त्याचे गुणदोष ॥१॥
नीच हे याति अनामिक नांव । तेथे भावाभाव कोण कैचा ॥२॥
चाहाड चोर जार भ्रष्ट ते साचे । हीनत्व जन्मांचे पदरी आहे ॥३॥
चोखा म्हणे त्यांचे संगती पडिलो । बहु हे पीडिलो वियोगाने ॥४॥
