वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › २. सार्थ अभंग ५०१ ते १०००

रूप नांव माया बोलावय

🙏 3. संत तुकाराम · ABH-078488 · अभंग क्र. ८५९

859.
रूप नांव माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयापरि ॥१॥
सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवी समजती ॥धृपद॥
पोटा आले तिच्या लोळे मांडिवरी । पारखी न करी खंती चित्ती ॥२॥
तुका म्हणे भक्तीसाठी हरीहर । अरूपीचे क्षरविभाग हे ॥३॥

अर्थ :
देवाला या परब्रम्हाला नांव व रूप नाही परंतु ब्रम्ह हे सगुण रूपाने आले म्हणून आम्हा भक्तांची हि उत्तम सोय झाली त्या ब्रम्हाच्या ठिकाणी आमचा सद्भाव ठेवणे आणि त्याच्या बरोबर बोलावयास आधार मिळाला. पुथ्वीवरती अनेक ठिकाणी शिव म्हणजे कुंपणे घातली हि मर्‍यादित लोकांची कल्पना आहे परंतु शहाण्या विचारवंत लोकांना पृथ्वी हि अखंड आहे हे सहज समजते. आईच्या मांडीवर बालके लोळतात कावतुकाने खेळतात त्या विषयी लोकांना कोणत्याही प्रकारचा संशय येत नाहीअर्थात त्या बालकाचा भाव निरागस आहे हे लोक जाणत असतात. तुकाराम महाराज म्हणतात देवाची भक्ती करता यावी म्हणून हा ब्रम्ह हरी आणि हर हे या पृथ्वीवर सगुण रूपाने साकार झाले आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग