कीर्तन केले ब्रम्हान
1084.
कीर्तन केले ब्रम्हानंदे ।
ध्रुव प्रल्हादे एकनिष्ठ ॥१॥
तया केले सुखसंपन्न ।
त्रैलाक्यी मान वाढवुनी ॥२॥
तैसेचि शुक नारदमुनी ।
पावले कीर्तनी समाधिसुख ॥३॥
निळा म्हणे बहुता संता ।
कीर्तन अव्दैता मेळविले ॥४॥
1084.
कीर्तन केले ब्रम्हानंदे ।
ध्रुव प्रल्हादे एकनिष्ठ ॥१॥
तया केले सुखसंपन्न ।
त्रैलाक्यी मान वाढवुनी ॥२॥
तैसेचि शुक नारदमुनी ।
पावले कीर्तनी समाधिसुख ॥३॥
निळा म्हणे बहुता संता ।
कीर्तन अव्दैता मेळविले ॥४॥