(मंबाजी गोसव्याने मा
3449.
(मंबाजी गोसव्याने मारले त्यासमयीचे अभंग)
पावलो पावलो । देवा पावलो रे ॥१॥
बरवे संचित होते तैसे झाले रे । आता काय बोलो रे ॥२॥
सोज्ज्वळ कंटकवाटा भावे करू गेलो रे । तुका म्हणे करूनि वेगळा केलो रे ॥३॥
अर्थ :
देवा, मला सारे काही भरून पावले आहे रे. जसे माझ्या नशिबात होते, त्या प्रमाणे मला त्याचा योग्य तो अनुभव आला आहे. आता अधिक काय बोलू रे?. तुकाराम महाराज म्हणतात, वाटेतले काटे दूर करून चांगली वाट करण्यासाठी चांगल्या वृत्तिने प्रयन्त केला, तर मंबाजीने दूर नेउन मला मारले रे!.
