वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 212. खेळिया

नव्हे तेंचि कसे जाले

🙏 4. संत नामदेव · ABH-082161 · अभंग क्र. २११८

2118.
नव्हे तेंचि कसे जाले रे खेळिया | नाही तेंचि दिसू लागले रे |अरूप होते ते रूपासि आले | जीव शिव नाम पावले रे ॥१॥
आपलिच आवडी धरून खेळिया | आपआपणाते व्याले रे |जीवनाकारणे केली बायको | तिने एवढे वाढविले रे॥२॥
ऐक खेळिया तुज सांगितले | ऐसे जाणुनि खेळ खेळे रे ॥ धु० ॥
ब्राह्मणाचे पोर एक खेळासि भ्याले | ते बारा वर्षे लपाले रे |कांपत कांपत बाहेर आले | ते नागवेंचि पळून गेले रे ॥३॥
सहा तोंड्या एक संभूचे बाळ | त्यागे बहुतचि बळ आथीयेले रे |खेळ खेळता दगदगी व्याले | ते कपाट फोडुनि गेले रे ॥४॥
चह तोंड्याचा पोर एक नाऱ्याही जाण | तो खेळियामाजी आगळा रे |कुचाली करूनी पोरे भांडवी | आपण राहे वेगळा रे ॥५॥
गंगा गौरी दोघी भांडवी | संन्यासी धाडले राना रे |खेळ खेळे परि डायी न सांपडे | तो एक खेळिया शहाणा रे ॥६॥
खेळिया माजी हनुम्या शहाणा | न पडे कामव्यसनी रे |कामचि नाही तेथे क्रोधचि केचा | तेथे कैचे भांडण रे |राम्या गड्याची आवडी मोठी | म्हणूनि लंके पेणे रे ॥७॥
यादवाचा पोर एक गोप्या भला | तो बहुतचि खेळ खेळला रे |लहान थोर अवघे मारिली | खेळचि मोडनि गेला रे ॥८॥
ऐसे खेळिये कोट्यानकोटी | गणित नाही त्याला रे | विष्णुदास नामा म्हणे वडील हो | पहा देही शोधुनी रे ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग