वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ५, काकड आरती अभंग

उठा अरुणोदय प्रकाश झ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073160 · अभंग क्र. २८

28.
उठा अरुणोदय प्रकाश झाला । घंटा गजर गर्जिन्नला ।
हरि चौघडा सुरु झाला । काकड आरती समयाचा ॥१॥
महाद्वारी वैष्णवजन । पूजा सामुग्री घेऊन ।
आले द्यावे तयांसी दर्शन । बंदिजन गर्जती ॥२॥
सभामंडपी कीर्तन घोष । मृदंग टाळ विणे सुरस ।
आनंदे गाती हरिंचे दास । परम उल्हास करूनिया ॥३॥
चंद्रभागे वाळवंटी । प्रातःस्नानाची जनदाटी ।
आता येतील आपुले भेटी । उठी उठी गोविंदा ॥४॥
ऐसे विनवी रुक्मिणी । जागृत झाले चक्रपाणी ।
नामा बद्धांजुळी जोडुनि । चरणी माथा ठेवितसे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग