वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 223. दशावतार वर्णन

प्रल्हादाकारणे स्तंभ

🙏 4. संत नामदेव · ABH-083865 · अभंग क्र. २१५१

2151.
प्रल्हादाकारणे स्तंभि अवतार | भक्त राजेश्‍वर म्हणताती |१॥जळी स्थळी नाहे सर्वा ठायी हरी | प्रत्यक्ष तू न्याहारी स्तंभामाजी ॥२॥
ऐकतांचि वाणी क्रोधासी चढला | खड्ग तो काढिला कोशांतून ॥३॥
तये काळी हांक मारिली प्रचंड | फोडिले ब्रह्मांड नरसिहे ॥४॥
धरुनिया दैत्य वेगी मांडीवरी | नखाने तो चिरी पोट त्याचे ॥५॥
जयजयकार जाला ब्रह्मादि पातला | इंद्रादिक आला देवांसहित ॥६॥
करूनिया स्तुति देव शांतविला | प्रल्हाद तो जाला पूर्ण भक्‍त ॥७॥
नामया हो जाली मायबाप भेटी | लाभ उठाउठी आनंदाचा ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग