करुनी आरती । नामा आल
290.
करुनी आरती । नामा आला घराप्रती ॥1॥
तेणे धरियेले व्रता । अन्न न घ्यावे सर्वथा ॥2॥
ऐसा जाणोनिया नेम । अनुभवी पुरुषोत्तम ॥3॥
आषाढी एकादशी । विप्रवेषे ह्रुषिकेशी ॥4॥
आला नामयाचे सदनी । नाम गाय दासी जनी ॥5॥