संता वाचुनिया सुख को
101.
संता वाचुनिया सुख कोठे नाही । अमृत ज्याचे पायी नित्य वसे ॥
संताचे संगती होय मोक्ष गती । नको बा संगती दुर्जनांची ॥
दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय । तेथे कैची सोय तारावया ॥
बोधला म्हणे सत्य हे त्रिवाचा । नको अभक्तांचा संग देवा ॥
