संसार दुःखमूळ हे तव
102.
संसार दुःखमूळ हे तव भव सबळ । यालागी भुलो नको । चित्ती धरा गोपाळ ॥
आरे सावध होई आता । तोडी भवमूळ व्यथा । सद्गुरूसी शरण जाई । कृपा करील रे आता ॥
आरे माया कठिन भारी । घाली दुःखाचे घरी । दुःख हे सोसवेना । चढे विखाची लहरी ॥
अरे सुख जरी भोगिसील तरी । जवळिच आहे विश्वास न धरिसी वरि सांगोन काये ॥
सार्थक करिसील सांगतो वचन । दृढ चित्ती धरी तुज विठोबाची जाण ॥
बोधला म्हणे जना का रे हित विचाराना । विठाई माऊली देते प्रेमाचा पान्हा ॥
