विठोजी कृपेचा सागर ।
298.
विठोजी कृपेचा सागर ।
दीनबंधु करुणाकर ॥१॥
म्हणोनिया स्तवित संत ।
होऊनि याचे चरणी रत ॥२॥
उपेक्षूनिया न सांडी कोणा ।
शरणाता थोरा लहाना ॥३॥
निळा म्हणे धरिले हाती ।
तया मग न सोडी कल्पांती ॥४॥
298.
विठोजी कृपेचा सागर ।
दीनबंधु करुणाकर ॥१॥
म्हणोनिया स्तवित संत ।
होऊनि याचे चरणी रत ॥२॥
उपेक्षूनिया न सांडी कोणा ।
शरणाता थोरा लहाना ॥३॥
निळा म्हणे धरिले हाती ।
तया मग न सोडी कल्पांती ॥४॥