संतकृपावरदबळे ।
870.
संतकृपावरदबळे ।
माझी वचनामृतफळे ॥१॥
स्वीकारिजे पंढरीनाथे ।
बैसोनिया सादर चिते ॥२॥
म्हणती गोड हे तुझी वाणी ।
सद्गुरुकृपेची बोलणी ॥३॥
निळा म्हणे श्रोते संत ।
प्रसन्नपणे दत्तचित्त ॥४॥
870.
संतकृपावरदबळे ।
माझी वचनामृतफळे ॥१॥
स्वीकारिजे पंढरीनाथे ।
बैसोनिया सादर चिते ॥२॥
म्हणती गोड हे तुझी वाणी ।
सद्गुरुकृपेची बोलणी ॥३॥
निळा म्हणे श्रोते संत ।
प्रसन्नपणे दत्तचित्त ॥४॥