संती केला अंगिकार ।
869.
संती केला अंगिकार ।
मज हा निर्धार बाणला ॥१॥
त्यांचिया बोले अभयदाने ।
नि:शंक वचने ही ऐशी ॥२॥
नाही कोठे गोंवागुंती ।
अक्षरे चालती गुंफिली ॥३॥
निळा म्हणे सत्यासाठी ।
जाणती चावटी माझी ते ॥४॥
869.
संती केला अंगिकार ।
मज हा निर्धार बाणला ॥१॥
त्यांचिया बोले अभयदाने ।
नि:शंक वचने ही ऐशी ॥२॥
नाही कोठे गोंवागुंती ।
अक्षरे चालती गुंफिली ॥३॥
निळा म्हणे सत्यासाठी ।
जाणती चावटी माझी ते ॥४॥