वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

पित्याचिये काजा देह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086868 · अभंग क्र. ३३८०

3380.
पित्याचिये काजा देह हे वेंचावें । तेव्हांची बरवे दिसे लोकी ॥१॥
सरसावला पुत्र म्हणे मातेप्रती । वांचवीं भूपती सत्वा हाती ॥२॥
तोषेल श्रीपती मज ऎसे किती । पुत्र तुम्हा होती सत्वधीर ॥३॥
एका जनार्दनी सत्वाचा आगळा । प्रिय तो गोपाळ तोचि एक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग