वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 16. मुरली - अभंग १४८ ते १६५

कशी जाऊ मी वृंदावन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085730 · अभंग क्र. १५५

155.
कशी जाऊ मी वृंदावन । मुरली वाजवी कान्हा ॥धृ.॥
पैलतीरीं हरी वाजवीं मुरली । नदी भरली यमुना ॥१॥
कांसे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करु बाई कोणाला सांगु । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरीने कौतुक केले । जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवा महात्म्य कळेना कोणा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग