विठ्ठलभावभक्तिफल - अ
2133.
विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९
भक्ताचिया काजा । उभा पंढरीचा राजा ॥१॥
घेऊनिया परिवार । उभा तिष्ठे निरंतर ॥२॥
शोभे गोपाळांची मांदी । रूक्मिणी सत्यभामा आदि ॥३॥
शोभे पुढे भीवरा नीर । भक्त करती जयजयकार ॥४॥
एका जनार्दनी ध्यान । चिमणें रूप गोजिरे ठाण ॥५॥
