हीन याती पतीत अपराधी
38.
हीन याती पतीत अपराधी दुर्बळ । परि तुम्ही दयाळ दीनानाथ ॥१॥
अनाथा कैवारी त्रिभुवनी ठसा । नामाचा भरंवसा त्रिभुवनी ॥२॥
नाम घेता कोणी न दिसे वाया गेला । ऐसाची गमला भावबळे ॥३॥
बंका म्हणे सर्वज्ञा विठोबा दयाळा । पुरवावा लळा हाची माझा ॥४॥
