हरिकीर्तनाच्या योगे
705.
हरिकीर्तनाच्या योगे ।
आम्हासी जगे जाणिजे ॥१॥
नाही तरी होतो ठावा ।
कोठे देवा कोणासी ॥२॥
जेवी वोहळासी प्रतिष्ठा ।
पावता तटा गंगोदका ॥३॥
निळा म्हणे प्रकाशदिप्ती ।
चंद्रज्योती वन्हिसंगे ॥४॥
705.
हरिकीर्तनाच्या योगे ।
आम्हासी जगे जाणिजे ॥१॥
नाही तरी होतो ठावा ।
कोठे देवा कोणासी ॥२॥
जेवी वोहळासी प्रतिष्ठा ।
पावता तटा गंगोदका ॥३॥
निळा म्हणे प्रकाशदिप्ती ।
चंद्रज्योती वन्हिसंगे ॥४॥