वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आत्मज्ञान डोळा दिसे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075939 · अभंग क्र. १९८

198.
आत्मज्ञान डोळा दिसे ऐसे नाही ।
लक्षी जैसे पाही मने काही ॥१॥
बुद्धीचा उपरम होईल सर्वही ।
आत्मज्ञान ठाई पडे तेव्हा ॥२॥
आत्मज्ञान नव्हे सुवर्णाचा गोळा ।
चंद्र-सूर्य येळा सापडेल ॥३॥
बहेणि म्हणे ज्ञान साधेल संगती ।
संतांचे निश्चिती बुद्धि-योगे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग