सुखी केले सुखी केले
832.
सुखी केले सुखी केले ।
संती दाविले निज हित ॥१॥
जन्मोजन्मी दास त्यांचा ।
पोसणा ठायीचा पुरातन ॥२॥
नित्य आपुला आठव देती ।
आणि पुरस्कारिती निज सेवे ॥३॥
निळा म्हणे हेचि त्यांचे ।
वर्तन ठायीचे पूर्वापार ॥४॥
832.
सुखी केले सुखी केले ।
संती दाविले निज हित ॥१॥
जन्मोजन्मी दास त्यांचा ।
पोसणा ठायीचा पुरातन ॥२॥
नित्य आपुला आठव देती ।
आणि पुरस्कारिती निज सेवे ॥३॥
निळा म्हणे हेचि त्यांचे ।
वर्तन ठायीचे पूर्वापार ॥४॥