आम्ही हरिचे संवगडे ।
154.
आम्ही हरिचे संवगडे । जुने ठायी चे वेडे बागडे ।
हाती धरुनि कडे । पाठीसवे वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एक देही ।
नाही झालो कई । एका एक वेगळे ॥२॥
निद्रा करिता होतो पायी । सवेंचि लंका घेतली तई ।
वानर गोवळ गाई । सवे चारित फिरतसो ॥३॥
आम्हा नामाचे चिंतन । रामकृष्ण नारायण ।
तुका म्हणे क्षण । खाता जेविता न विसंबो ॥४॥
