वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

कवतुक पहावया निरंजना

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074321 · अभंग क्र. ७००

700.
कवतुक पहावया निरंजना गेलीये ।
तव निराकार जाले बाईयो वो ॥१॥
अकरासहित पाच पाची मावळली ।
आदि अंती उदयो जाली तेजाकारे ॥२॥
रखुमादेविवरु परतोनी देखे ।
तोही पारूषे तिये ठायी गे माये ॥३॥

अर्थ :
निरंजना म्हणजे परमात्मा त्याचे कवतुक पाहण्यांकरीता त्याच्याकडे गेले. तो मी स्वतःच निराकार होऊन बसले. दहा इंद्रिये व मन ज्या पंचमहाभूतांची झाली ती पाच भूते आपल्या स्वरूपांत मावळली त्या पंचमहाभूतांच्या उत्पत्तीच्या पूर्वी असणारी जी ब्रह्मज्योति तिचा अंतःकरणांत ज्ञानरूपाने उदय झाला. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्याकडे मी परतून पाहु लागले. तो ते ही माझ्या स्वरूपांमध्ये लय पावले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग