वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › १. सार्थ अभंग १ ते ५००

आम्हा हे कौतुक जगा द

🙏 3. संत तुकाराम · ABH-077553 · अभंग क्र. ४६८

468.
आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपे । काय व्हावे कोपे जगाचिये ॥धृपद॥
अविद्येचा येथे कोठे परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥२॥
तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोटया परी ॥३॥

अर्थ :
जगाला नीती शिकवावी, जो चुकत असेल त्याला फजित कराव याचंच आम्हाला कौतुक वाटतं, म्हणजे तेच श्रेयस्कर वाटतं. एकाच्या निरोपाने कशाची बाधा होणार आहे ? जगावर कशाला कोपावं ? जिथे रामकृष्ण नामाचे बाण आहेत तिथे अविद्येचा त्रास कसा असेल ? तुकाराम महाराज म्हणतात इथे खर विकलं जातं, इथे खोटं चालणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग