निराकृती धीर नैराश्य
62.
निराकृती धीर नैराश्य विचार । परिपूर्ण साचार वोळलासे ॥१॥
ते रूप रूपस सुंदर सुरस । तो पूर्ण प्रकाश गोकुळी रया ॥२॥
नानारूप हरपे दृश्य द्रष्टा लोपे । तो प्रत्यक्ष स्वरूपे नंदाघरी ॥३॥
निवृत्ति सादर निराकार अंकुर । साकार श्रीधर गोपवेष ॥४॥
अर्थ:
तो परमात्मा निराकार आशारहित तरी सर्व गुणानी परिपूर्ण होऊन अवतरला आहे. त्या सुंदर सुकुमार व सुरस रुपातुन प्रत्यक्ष प्रका़श होऊन गोकुळात आला आहे. जाच्या स्वरुपात अनेक रुप हरपतात दृष्यादृष्यत्व विलीन होते तो नंदा घरी कृष्णरुपात अवतरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात गोपाळ वेशात अंकुरलेला तो कोंभच कृष्णरुपातील साकार परमात्मा आहे.
