वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

गगनी भासले अगणीत तार

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074428 · अभंग क्र. ५४३

543.
गगनी भासले अगणीत तारे ।
तेथे मन मुरे वृत्तीसहीत ॥१॥
पर्जन्याच्या धारा भूमिवीण पडे ।
जेथे बुद्धी उडे समूळची ॥२॥
मसुरे प्रमाण सावळे अनंत ।
आव्हाकार गणिती तपामाजी ॥३॥
स्वरूपाचा पूर चिदाकाशी गेला ।
देखणा राहिला सहजची ॥४॥
ज्ञानदेव म्हणे स्वसुख रोकडे ।
निवृत्तीने पुढे दाखविले ॥५॥

अर्थ :
आकाशातील अनंत तारे पाहिले म्हणजे ते आकांशात कसे राहिले असे मानुन आश्चर्याने वृत्तीसहीत मन विरून जाते. पर्जन्याच्या धारांना वर कशाचाही आधार नाही. हे पाहून बुद्धी कुंठीत होते. अशा रितीने सर्वव्यापी स्वरूप ज्याचे आहे तो योगीलोकांना मसुरेच्या डाळी प्रमाणे दिसतो. सर्व दृश्य मात्र वस्तु त्या चिदाभासाने प्रकाशित होते. ही गोष्ट कळल्यावर पाहणारा साहजिकच तटस्थ होणार. निवृत्तीनाथांनी मला ही रोकडी सुखाची गोडी दाखविली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग