किती धांवाधांवी कराव
122.
किती धांवाधांवी करावी कोरडी । न कळे कांही जोडी हानि लाभ ॥१॥
जे जे करितो ते ते फलकट । वाउगेंचि कष्ट दु:ख भोगी ॥२॥
निवांत बैसोनी नामाचे चिंतन । करू जाता मन स्थिर नाही ॥३॥
दान धर्म करू तो नाही धन पदरी । जन्माचा भिकारी होउनी ठेलो ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करंटा मी देवा । काय तुझी सेवा करू आता ॥५॥
