पतित पावना जानकीजीवन
62.
पतित पावना जानकीजीवना । सर्व सुखाच्या हरि बापा निधाना ॥
ऐसे पतित तो किती उधरिले । शरण आलिया कोण गेले ॥
आसे पतित तो उधरिले किती । बापस्वामी या लक्ष्मी पति ॥
दुष्ट कौरवी कपट रचिले । करुनिया विवर कैसे पांडव कैसे नेले ॥
दुष्ट कौरवी द्रुपदी पांचालि । ऐकोनि वचन कैसी धावणी केली ॥
जैसे पवाडे तुझे जगी गर्जती । महा महा पतित तो वो उध्दरिले किती ॥
जैसे ब्रीदे रे तुझी किती वाखाणु । बोधला म्हणे हे सुखाचे निधानु ॥
