भोंवरा - अभंग १९३ ते
193.
भोंवरा - अभंग १९३ ते १९४
भ्रम धरुनिया वाया कासया खेळसी भोवरां । यम मारी कुच्चा फिरशील चौर्याशीं घरां ॥१॥
पुढे शुद्धी करी वाचे स्मरे हरी । वाया भ्रमे फिरशी गरगरा पडसी मायाफेरी ॥२॥
एका वारी एक मारिताती घाय । दया नाही येत कोणाखाली न ठेविती पाय ॥३॥
एका शरण जनार्दनी तरीच चुके फेरा । नाहींतरी फिरशी गरगरा ॥४॥
मेळवीं संवगंडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥
सांवळा सुंदरा वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥
मुगुट कुंडले चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळां कौस्तुभमणी ॥३॥
एका जनार्दनी वेधलेसे मन । नाही भेद भिन्न गौळनींसी ॥४॥
