वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(छ. शिवाजी महाराजांन

🙏 3. संत तुकाराम · ABH-080540 · अभंग क्र. ३४१३

3413.
(छ. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नेण्याकरता घोडाकारकून अबदागिरी पाठविली त्यावेळी कारकुणा बरोबर पाठविलेला निरोप)
दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यांत न पडे ॥१॥
आता येथे पंढरिराया । मज गोविसी कासया ॥धृपद॥
मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा ॥२॥
तुका म्हणे देवा । माझे सोडववणे धावा ॥३॥

अर्थ :
प्रथम तुकाराम महाराज देवाला म्हणतात की, देवा दिवट्या छत्री घोडे हे माझ्यासाठी चांगले नाही. हे पंढरीराया आता या मोहात तू मला कशाला गुंतवत आहेस ? मानसन्मान, दंभ, प्रतिष्ठा हे तर मला शुक्राच्या विष्ठेप्रमाणे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, यातून मला सोडवण्यासाठी देवा तुम्ही लवकर धावा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग