वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(महाराजांनी ज्ञानेश्

🙏 3. संत तुकाराम · ABH-080461 · अभंग क्र. ३४१२

3412.
(महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहिले)
तुम्ही येथे पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥
आता काय पुढे वाढवुनि विस्तार । झाला समाचार आइका तो ॥धृपद॥
देवाचे उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥२॥
तुका म्हणे सेवा समर्पूनि पायी । झालो उतराई ठावे असो ॥३॥

अर्थ :
हे सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुम्ही माझ्याकडे जो धरणेकरी ब्राम्हण पाठविला त्याबद्दल झालेला वृत्तांत तुम्ही ऐका. आता मी पुढे विस्तार काय वाढवत बसू जो प्रकार झाला त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका. देवाची प्राप्ती करुन घेण्यासाठी जो उचित मार्ग आहे तोच उचित मार्ग मी अकरा अभंगांच्या माध्यमातून त्याला सांगितला परंतू या महाफलाचा ( तुकाराम महाराजांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी प्रसादाचा ) तो त्याग करुन येथून गेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे ज्ञानेश्वर महाराज तुम्ही जी मला सेवा सांगितली ती सेवा मी पूर्ण केली व ती तुमच्या पायाच्या ठिकाणी मी समर्पण करुन उतराई झालो आहे हे तुम्हाला ठाऊक असो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग