रमेसह पंढरी आला । ये
475.
रमेसह पंढरी आला । येऊनि भेटला पुंडलिका ॥१॥
म्हणे उभारुनि बाह्मा हात । तरतील नामे महापतित ॥२॥
नका कांही आटाआटी । योग यागांची कसवटी ॥३॥
ब्रह्माज्ञान नसाधे लोका । मुखी घोका विठ्ठला ॥४॥
शरण एका जनार्दनी । सांगे वचनी पुंडलीक ॥५॥
