वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

आहाडे पाहाडे गे वावु

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089731 · अभंग क्र. २२८

228.
आहाडे पाहाडे गे वावुगेचि झगडे ।
नको करु बाई आता पाहे मागे पुढे ॥१॥
सावळा श्रीरंग गे व्यापूनि असे जग ।
त्यासि नव्हे क्षत ऐसे बोल बोले चांग ॥२॥
वेडया वाकुडया गोठी गे नको काढू वोठी ।
ध्यानी मनी गीती गाई कान्हो जगजेठी ॥३॥
निळा म्हणे निंदास्तुति जयासि समान ।
त्याचि सवे बोल उणे करिल बहुमान ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग