संतांच्या चरणा द्याव
881.
संतांच्या चरणा द्यावे आलिंगन | जीवे निंबलोण उतरावे ॥१॥
तेथेची निश्चळ राहे माझ्या मना | मग तुज यातना नव्हती काही ॥२॥
संतांचे द्वारीचा होई द्वारपाळ | तुटे मायाजाळ मोहपाश ॥३॥
संतांचे प्रसाद सेविसी उरले | आयुष्य सरले दुणावले ॥४॥
नामा म्हणे संत आहेत कृपासिंधु | देती भक्तिबोधु प्रेमसुख ॥५॥
