भस्म तो होतसे आला जो
880.
भस्म तो होतसे आला जो आकार । नासे प्रपंच सारा नाममंत्र ॥१॥
झाला अनुभव प्रपंचींच ब्रह्म । मना झाला निश्चय संतकृपे ॥२॥
म्होनिया संता जावोनि शरण । साधुनि निजधन नामब्रह्म ॥३॥
नामदेव म्हणे संतांचेनि कृपें। हृदयी नाम सोपे नांदतसे ॥४॥
