वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

बहेणाबाई-ऐकियेले तुझ

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075922 · अभंग क्र. १५१

151.
बहेणाबाई-ऐकियेले तुझे वचन सादर ।
तुवा जो निर्धार केला असे ॥१॥
मानले माझिया स्थळ जाण चित्ता ।
परि ऐक आता एक माझे ॥२॥
नाही अवकाश ते स्थळी जावया ।
मृत्यूच्या सध्यालागी पाहे ॥३॥
प्रतिपदे आम्हा टाकणे शरीर ।
आजि तो साचार त्रयोदशी ॥४॥
यालागी निश्चय सांगतसे एक ।
तीर्थ आम्हा देख प्रणिता असे ॥५॥
रावणे रे येथे केले अनुष्ठान ।
शंकर प्रसन्न येथे जाला ॥६॥
वाहियेली शिरे नवही पुजेसी ।
सहस्त्र अठ्यायसी ऋषी आले ॥७॥
ब्रह्मादिक देव यज्ञाच्या सन्निध ।
तीर्थ हे प्रसिद्ध शिवपूर ॥८॥
अवभृथस्थानी वरद तयांचा ।
समूह तीर्थांचा येथे असे ॥९॥
प्रणिता तीर्थाऐसे तीर्थ भूमंडळी ।
नाही चंद्रमौळी बोलिलासे ॥१०॥
काशी गया तीर्थ सर्व याची स्थळी ।
मानुनी सकळी स्थान कीजे ॥११॥
आमुचे मनीचा निर्धार हा खरा ।
माझिया अंतरा साक्ष आली ॥१२॥
तुवा हे वचन वंदुनी मस्तकी ।
असावे स्वस्थ की होवोनिया ॥१३॥
बहेणि म्हणे पुत्रा सांगितले मनी ।
धरूनी वचनी सिद्ध राहे ॥१४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग