वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

धर्म तो न कळे । काय

🙏 3. संत तुकाराम · ABH-077954 · अभंग क्र. २१५६

2156.
धर्म तो न कळे । काय झांकिलये डोळे ॥१॥
जीव भ्रमले या कामे । कैसी कळो येती वर्मे ॥धृपद॥
विषयांचा माज । काही धरू नेदी लाज ॥२॥
तुका म्हणे लांसी । माया नाचविते कैसी ॥३॥

अर्थ :

धर्म काय आहे ते काही लोकांना कळत नाही मात्र डोळे झाकून तर बसतात. सर्वांचे जीव कामवासनेने भ्रमले आहे त्यामुळे धर्माचे खरे वर्म कशात आहे हे कसे कळून येईल. विषयाचा माज जिकडे-तिकडे सर्वांच्या अंगी लागलेला आहे त्यामुळे धर्म रक्षण कसे करावे धर्माचे खरे वर्म काय आहे याविषयी थोडी देखील लाज ते ठेऊ देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात ही मायारूपी राक्षस लोकांना कशी नाचवीत आहे ते पहा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग