तोडी़ हे बिरडे मोह म
772.
तोडी़ हे बिरडे मोह ममता आधीं|विषय बाधा कधी गुंफो नको॥१॥
असे घराश्रमी भजे सर्वांभूतीं|मी माझे पुढती म्हणो नको॥२॥
तू तंव लटिका आलासी कोठुनि|मी माझे म्हणोनि म्हणतोसी॥३॥
नामा म्हणे मूळ राम परब्रह्म|जगाचा विश्राम त्यासी भजे॥४॥
