वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

करुणेची उत्तरे बोले

🙏 4. संत नामदेव · ABH-082617 · अभंग क्र. १७६४

1764.
करुणेची उत्तरे बोले नामदेव | ऐकोनि पंढरिरावो हांसिनले ॥१॥
मग हे विवंचना सांगे रुक्माईसी | म्हणे नामयासि आणा वेगी ॥२॥
मग रुक्माई चरणी ठेवी माथा | म्हणे आणा जी समर्था नामयासी ॥३॥
मग पंढरीराव रुक्माई ज्ञानदेव | पुंडलीक समुदाय चालिलासे ॥४॥
येऊनि नाम्यापाशी उभे ठाकले | पुंडलीक बोले नामयासी ॥५॥
धन्य नामदेवा तुझा एक भाव | सहित पंढरीराव आले तेथे ॥६॥
पीतांबर छाया रूप प्रगट केले | नामया आलिंगिले पांडुरंगे ॥७॥
कडे घेऊनि नामा रखुमाई जननी | प्रेमपान्हा वोसंडोनि पाजी तया ॥८॥
नामयासि घेऊनि आले पंढरीसी | बैकुंठ ओवारिसी कळस केला ॥९॥
नामयाचे मुखी घालुनि कवळु | पुसे हा गोपाळु सिण भाग ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग