वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ७. संत महिमा अभंग ७१० ते ७२०

अखंड हरि वाचेसी ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074566 · अभंग क्र. ७१०

710.
अखंड हरि वाचेसी ।
जरी सुकृताची राशी ।
तरीच हरि ये मुखासी ।
धन्य जन्मासी तो आला ॥१॥
देखता ज्याचे चरण ।
यम जातसे शरण ।
ऐसे सुकृताचे वर्णन ।
कवणे करावे तयाचे ॥२॥
तोचि एक साधु देखा ।
नित्य पुसावे त्या विवेका ।
तो काही न धरी शंका ।
हरिनाम म्हणतसे ॥३॥
ज्ञानदेवी निजसूत्र तोचि ।
धन्य शुद्ध पवित्र ।
हरिवांचूनि त्याचे वका ।
नेणे आणिक दुसरे ॥४॥

अर्थ :
जर अनंत जन्माच्या पुण्याईच्या राशी असतील तरच श्रीहरिचे नाम मुखावाटे येईल. असे नामस्मरण करणाऱ्या पुरूषाचा जन्मही धन्य आहे. त्याचे चरणाचे दर्शन झाले तर साक्षात् यमसुद्धा त्याला लोटंगण घालतो. ज्या पूर्व जन्मार्जित सत्कर्माचे एवढे फल आहे. त्याचे वर्णन कोणी करावे ते धन्य आहेत. आत्मज्ञान संपन्न जे असतील ते खरे साधु आहेत. त्यांना शरण जाऊन आत्मानात्म विवेक विचारावा ते हरिनामस्मरण करणारे, संत आहेत किंवा नाहीत अशी शंका मनांत
धरू नये. आत्मकल्याणाची सूत्र म्हणजे मार्ग तोच पवित्र पुरूष जाणत असून त्याची वाणी हरिनाम उच्चारावाचून दुसरे काही जाणत नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग