वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

जीवाचा ही जीव तूचि प

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089285 · अभंग क्र. ६६८

668.
जीवाचा ही जीव तूचि प्राणांचा प्राण ।
नयनाचेहि नयन तूचि घ्राणाचे घ्राण ॥१॥
सर्वही इंद्रियभाव तूचि माझे श्रीहरी ।
तुजविण न दिसे पाहता मज मी माझारी ॥२॥
चित्ताचेहि चित्त तूचि मनाचे मन ।
श्रवणाचेहि श्रवण तूचि रसनेची रसना ॥३॥
निळा म्हणे तूचि माझा सर्वहि व्यापक ।
देहादेही शोधूनि पाहता न दिसे आणिक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग