वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

ज्या नामे अनंत न कळे

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090018 · अभंग क्र. ६०

60.
ज्या नामे अनंत न कळे संकेत । वेदाचाही हेत हारपला ॥१॥
ते रूप सानुले यशोदे तान्हुले । भोगिती निमोले भक्तजन ॥२॥
अनंत अनिवार नकळे ज्याचा पार । जेथे चराचर होते जाते ॥३॥
निवृत्तिसंकेत अनंताअनंत । कृष्णानामे पंथ मार्ग सोपा ॥४॥

अर्थ:
अनंत नाम असणाऱ्या परमात्याचे यथार्थ वर्णन करायला वेदांचा ही विचार खुंटला. तो परमात्मा यशोदेच्या घरी तान्ह्या रुपात आल्यावर भक्तांना ही विनासायास त्याचा लाभ झाला.अनंत व अनिवार रुपाच्या परमात्माचा पार लागत नाही.त्याच्यात अनेक चराचरे घडत व बिघडत असतात निवृत्तिनाथ म्हणतात अनंत असलेला परमात्मा जाणण्याचा उपाय म्हणजे कृष्णनामपंथ होय.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग