नाम घेता भगवंताचें|
759.
नाम घेता भगवंताचें| पाश तुटती भवाचे॥१॥
जे जे नाही मी रत जाले| ते ते केशवी तारिले॥२॥
गणिका दुराचारी|नामे तारिली अहिल्या नारी॥३॥
महापापी अजामेळ| तोही तारिला चांडाळ॥४॥
नामे गजेंद्र तारिला| देवे मोक्षपदासी नेला॥५॥
नाम घेतसे पांचाळी|उभा बाप वनमाळी॥६॥
नामा सांगे भाविकांसी|नाम घ्यारे अहर्निशीं॥७॥
